
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष हिवरा येथे एकाच रात्री पाच ठिकाणी घरपोडी चोरट्यांचा धुमाकूळ
हिवरा ( संगम ) प्रतिनिधी
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा परिणाम जाणवत असल्याचे बरेच नागरिकाकडून बोलल्या जात असून मागील काळात हिवरा येथिल बऱ्याच नागरिकांच्या शेळ्या . काळा रगाचा सांड्या ( कठाळ्या ) व गुरेढोरे चोरून नेल्याच्या घटना कानी पडत असून पोलीस प्रशासन मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने चोरट्यांचे पाठबळ वाढत असल्याचे बोलल्या जात आहे आत्तापर्यंत गावात व परिसरात झालेल्या चोरांपैकी एकाही चोरीचा छडा पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्गांना लावता आलेला नाही असे नागरिकाकडून बोलल्या जात आहे . अवैध धंद्यांना मोठा वाव मिळत असून त्यावरही अंकुश पोलीस प्रशासनाला अद्याप लावता आलेला नाही हे मात्र गावात चालत असलेल्या मटका काउंटर मुळे सिद्ध होत आहे. गावातील ग्रामपंचायत मार्फत अवैध धंदे बंद करण्याबाबत निवेदन देऊन हि आज कित्येक दिवस उंलटून सुद्धा अवैध धंदे चालूच असल्याने नागरिकांचा पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला दिसत नाही त्याच अनुषंगाने या चोरीचा छडा लागेल असे . निश्चित सांगता येणार नाही अशा चर्चांना गावकऱ्याकडून चर्चेला उधाण असून . हिवरा संगम येथे पाच ठिकाणी घरे फोडून अडीच लाख रुपयाचे दाग दागिने लंपास केल्याची घटना घडली रामनवमीच्या शुभ पर्वावर चोरट्यांनी हिवरा गावाला लक्ष केले आहे. राष्ट्रीय महामार्ग जाणाऱ्या हिवरा बस स्थानकाजवळील घरांना चोरट्यांनी टार्गेट केले आहे. काल रात्री अंदाजे दीड वाजता चे सुमारास हिवरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या बँक असिस्टंट मॅनेजर चारुलता धोटे यांच्या घराचे कुलूप फोडून ८० हजार रुपयांचे दाग दागिने चोरून नेले चारुलता धोटे ह्या आपल्या बहिणीकडे यवतमाळ येथे मुक्कामी होत्या येथील पुष्पक कदम त्यांच्या घरी चोरट्यांनी मोर्चा वळून त्यांच्या घराची कुलूप तोडून अंदाजे दीड लाख रुपयाचे दाग दागिने चोरून नेले शे. खालिक शे. रोशन यांचे घरून चोरट्यांनी १० हजार रुपये रोख आणि काही चिल्लर वस्तू चोरून नेल्या शे. मुसा शे. अब्दुल व मोतीराम भैसे यांचे घरून चिल्लर वस्तू चोरून नेल्या या आधी पण भैसे यांच्या घरी चोरी झाली होती सदर घटनेची माहिती महागाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चोरीचा गुन्हा नोंद केला आहे . यावर्षी चोरट्यांनी हिवरा गावालाच टार्गेट केल्याचे दिसून येते . सदर घटनेचा तपास महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दिनेश आडे, संतोष जाधव, कैलास मार्कंड हे करीत आहे.