चौकट
बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
महागाव तालुक्यात बोगस बियाणे,रासायनिक खते विक्री रोखण्यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या वतीने भरारी पथक नेमण्यात आले असुन यामध्ये पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्यासह तालुका कृषी विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेले सदर पथक तालुक्यातील कृषी केंद्रांमध्ये सर्व बियाणे व खतांचे नमुना गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवीत आहेत.यामध्ये बोगस बियाणे,रासायनिक खते आढळुन आल्यास त्या कृषी केंद्र चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.तसेच शेतकऱ्यांना कोणी आपल्याला बोगस बियाणे दिल्याचा संशय आल्यास त्यांनी तत्काळ कृषी विभागाकडे तक्रार करावी त्यावरून सदर कृषी केंद्राची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
:- समाधान धुळधुळे (तालुका कृषी अधिकारी महागाव)
चौकट
बियाण्यांची माहिती व नमुना अहवाल दर्शनी भागात लावणे गरजेचे.
तालुक्यातील कृषी केंद्रांमध्ये बोगस बियाणे विक्री करण्याचे प्रकार सुरू आहेत.कृषी विभाग तपासणीच्या नावावर बियाण्याचे नमुने गोळा करतात परंतु त्यानंतर त्याचा तपासणी अहवाल प्रसिद्ध केल्या जात नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे संदर्भात कोणतीच माहिती मिळत नसल्यानेच शेतकऱ्यांची फसवणुक होत आहे.हे टाळण्यासाठी सदर बियाण्याची उगवण क्षमता तसेच इतर माहिती व कृषी विभागाने गोळा केलेल्या बियाणे प्रयोगशाळेचा अहवाल प्रसिद्ध करून तो कृषी केंद्रांमध्ये दर्शनी भागात लावावा.
:-युवा शेतकरी