
मांडवा येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
श्रीमद् संगीत भागवत ; श्री. समर्थ नागोजी महाराज यांच्या १०७वा पुण्यतिथी महोत्सव
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
श्री. समर्थ नागोजी महाराज यांच्या १०७ वा पुण्यतिथीनिमित्त पुसद तालुक्यातील मांडवा येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् संगीत भागवत सप्ताहाचे आयोजन १४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी पर्यंत श्री. समर्थ नागोजी महाराज देवस्थानात करण्यात आले होते.
भागवताचार्य ह.भ.प.गोविंद गुरु शास्त्री महाराज (कार्लेकर)यांच्या रसाळ वाणीतून प्रबोधन झाले.तर ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक ह.भ.प.अनंत महाराज माळकर बान्शीकर, उपस्थित होते. शुक्रवार (ता.१४) ह.भ.प. प्रमोद महाराज चोंढीकर (ता.जि. नांदेड) ,शनिवार (ता.१५)ह.भ.प. ज्ञानेश महाराज शिवनीकर,(ता.१६)ह.भ.प.स्नेहलताई महाराज कोळीकर,(ता.१७) स्वरमुर्ती विनोदाचार्य ह.भ.प.सुनिल महाराज पाटील घायाळ ,(ता.१८)ह.भ.प. अजय महाराज विदर्भरत्न (दादा) अनसिंगकर (ता.१९) स्वरकंठ ह.भ.प.काकासाहेब खैरे महाराज जालना(ता.२०) श्री समर्थ नागोजी महाराज पुण्यतिथी निमित्त सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .त्यानंतर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोठुळे भिवंडी(ता.२१) सकाळी ९वाजता गावातील मुख्य मार्गाने श्रीची पालखी काढण्यात आली .त्यानंतर १ वाजता ह.भ.प.किशोर महाराज दिवटे यांचे काल्याचे किर्तन झाले.
(ता.२०) सायंकाळी श्री .समर्थ नागोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त श्री .समर्थ नागोजी महाराज ऑटो संघटना मांडवा या संघटनेमार्फत पुसद ते मांडवा मोफत सेवा देण्यात आली .दि.२१ फेब्रुवारी रोजी यात्रेत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.