HomeUncategorizedरस्त्याच्या कामासाठी ईजनी वासियांचा महामार्गावर रास्तारोको

रस्त्याच्या कामासाठी ईजनी वासियांचा महामार्गावर रास्तारोको

रस्त्याच्या कामासाठी ईजनी वासियांचा महामार्गावर रास्तारोको

(शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प)

महागाव:-
रस्त्याचे काम मागील वर्ष भरापासुन अपूर्ण असल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने त्रस्त नागरिकांनी महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
महागाव तालुक्यातील ईजनी गावाला हिवरा(संगम) येथुन महामार्गाला जोडून रस्ता आहे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने नागरिकांनी रस्त्याचे काम करण्यात यावे याकरिता अनेक वेळा आंदोलने केली.त्याची दखल घेत शासनाच्या वतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधुन या रस्त्याचे डांबरीकरण काम मंजुर होवुन कोट्यवधी रुपयांचा निधी या कामासाठी देण्यात आला.वर्ष भरापुर्वी या रस्त्याच्या कामाला कंत्राटदाराने सुरुवात केली परंतु वेळ काढू व काम चलावुपणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या कंत्राटदाराच्या कारभाराने मागील वर्ष भरापासून या रस्त्याचे काम अपुर्ण अवस्थेत असल्याने नागरिक ,रुग्ण,शाळकरी विद्यार्थी यांना ये जा करतांना तारेवरची कसरत करून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांनी याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने हतबल झालेल्या नागरिकांनी आज या रस्त्याचे काम तत्काळ पुर्ण करण्यात यावे या मागणीसाठी हिवरा (संगम) येथे छत्रपती शिवराय चौकामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.जो पर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा पावित्रा आंदोलन कर्त्यांनी घेतल्याने संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी ,कर्मचारी यांनी रस्त्याचे काम लवकर पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या रास्ता रोको आंदोलनामुळे नागपुर तुळजापुर राष्ट्रीय महामार्ग तब्बल तासभर बंद होवुन वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
झालेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्या च्या हि चर्चा नागरिकाकडून काणी पडत असून रोड करत असताना गिट्टी हे साईज ला मोठी वापरण्यात आल्याचं नागरिकाकडून बोलल्या जात असून मुरूम सुद्धा हलका दर्जाचा वापरण्यात आला असल्याचे बोलले जात असून वाहनाची वर्दळ असल्याने मातीच्या कणांचा वाहन चालकांना अधिक त्रास होत असल्याचे बोलल्या जात आहे तरी हे सर्व काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केल्या जात आहे

RELATED ARTICLES

Most Popular