
सहा वर्षाच्या मुलाने ठेवला जीवनातील प्रथम रोजा हिवरा संगम
पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून. रविवारी दिनांक २/३/२०२५ ला महिन्याचा पहिला उपवास होता. उन्हाचे दिवस असताना देखील हिवरा येथील असद वसीम सुरय्या यांनी आपल्या वयाच्या सहाव्या वर्षी जीवनातील प्रथम रोजा ( उपवास ) ठेवला असून नातेवाईका सह गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केल्या जात आहे.व
परिसरात खाऊ वाटून आनंद व्यक्त केल्या जात आहे. गावचे प्रतिष्ठित नागरिक सफि हबिब सुरैया ( सफि सेठ )यांचा तो नातू आहे.
मुस्लिम धर्मात पवित्र रमजान महिन्यात रोजा उपवास केले जातात. रोजे अतिशय कडक असतात. त्यामुळे वयाच्या सहाव्या वर्षी असद वासिम सुरैया यांनी रोजा ठेवून तो पूर्ण केला असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केल्या जात आहे