HomeUncategorizedहिवरा ( संगम ) येथील श्री एकवीरा देवी संस्थानने घेतला डीजे बंदीचा...

हिवरा ( संगम ) येथील श्री एकवीरा देवी संस्थानने घेतला डीजे बंदीचा निर्णय.

हिवरा ( संगम ) येथील श्री एकवीरा देवी संस्थानने घेतला डीजे बंदीचा निर्णय.

(ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी विश्वस्त मंडळाचा निर्णय,जिल्ह्यातील पहिले मंगल कार्यालय)

प्रतिनिधी हिवरा संगम

ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी तसेच डिजेच्या आवाजामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी लग्न समारंभामध्ये डिजे बंदी करण्याचा निर्णय श्री एकवीरा देवी संस्थानच्या वतीने घेण्यात आला असुन जिल्ह्यातील पहिले डिजे मुक्त मंगल कार्यालय ठरले आहे.
लग्न समारंभ,वाढदिवस सोहळा यांसह महापुरुषांच्या जयंत्या,धार्मिक कार्यक्रमामध्ये डिजे वाजविण्याचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असुन यामध्ये आवाजाच्या मर्यादा पार केल्या जात असल्याने या डॉल्बी डिजेच्या कर्कश्य आवाजाने ध्वनी प्रदुषणात वाढ होवुन हृदयरोग,उच्च रक्तदाब, मिरागीचा आजार असलेल्या रुग्णांना तसेच वयोवृद्ध नागरिक,गरोदर महिला,लहान मुले यांना यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे शासनाच्या वतीने यावर निर्बंध लादण्यात आले असताना त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.यावर नियंत्रण ठेवणारी जबाबदार यंत्रणा मात्र हा सर्व जीवघेणा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी तसेच डिजेच्या आवाजामुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेवुन आठवे शक्तीपीठ असलेल्या श्री एकवीरा देवी संस्थानच्या वतीने संचालित असलेल्या मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्यात डिजे वाजविण्यावर बंदी घालण्याचा निर्णय आज दिनांन९मार्च २०२५ विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला असुन या पुढे मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यात डिजे वाजविण्यावर बंदी घालण्यात आली असुन डिजे वाजविण्यासाठी आग्रह धरणाऱ्या विवाह सोहळ्याने या मंगल कार्यालयात परवानगी देण्यात येणार नसल्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.विवाह समारंभ तसेच विविध कार्यक्रमांमध्ये डिजे वाजविण्यावर बंदी घालणारे श्री एकवीरा देवी संस्थानचे मंगल कार्यालयात जिल्ह्यात पहिले असुन जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालयांनी आपले समाजिक दायित्व जपत श्री एकवीरा देवी संस्थानचा आदर्श घेवुन आपल्या मंगला कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यांमध्ये डिजे वाजविण्यावर बंदी आणावी अशी प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.
श्री एकवीरा देवी संस्थानने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाचे नागरिकांनी स्वागत करून विश्वस्त मंडळाचे कौतुक केल्या जात आहे.
डिजे बंदी करणारे जिल्ह्यातील हे पहिले मंगल कार्यालय.असून
श्री एकवीरा देवी संस्थान नेहमीच सामाजिक दायित्व जपण्यास अग्रेसर राहिले असुन भुकंप, महापुर , कोरोना महामारी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये संस्थानच्या वतीने पंतप्रधान, मुख्यमंत्री सहाय्यतानिधी मध्ये भरीव आर्थिक मदत केली.तसेच कोरोना काळात संस्थानच्या मंगल कार्यालयात लोकवर्गणी व गावातील युवकांच्या मदतीने कोव्हिड सेंटर उभारून रुग्णांची सेवा सुश्रुषा केली.त्यावेळेस येथील कोव्हिड सेंटर जिल्ह्यात रोल मॉडेल ठरले होते.जिल्ह्यात आज मितीला शेकडो मंगल कार्यालये सुरू असुन त्याद्वारे काही जण निव्वळ पैसा कमविण्याची धोरण राबवितात.परंतु निसर्गरम्य परिसरात असलेले हे श्री एकवीरा देवी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने नफा तोटा याचा विचार न करता केवळ सामाजिक जबाबदारी पोटी ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी तसेच नागरिकांना उद्भवणाऱ्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्या मंगल कार्यालयामध्ये विवाह समारंभ व विविध सोहळ्यांमध्ये डिजे न वाजविता त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असुन असा धाडसी निर्णय घेणारे जिल्ह्यातील पहिले मंगल कार्यालय ठरले आहे.
प्रशासनाने दखल घेण्याची गरज.
डॉल्बी डिजेच्या आवाजावर शासनाने मर्यादा घातली असुन यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असताना मात्र जिल्ह्यात सर्वत्र पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अमर्यादित आवाज करून डिजे वाजविल्या जात आहे.त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याची गांभीर्याने दखल घेवुन जिल्ह्यातील मंगल कार्यालयामध्ये डिजे बंदी करण्याचे संबंधित मंगल कार्यलय व्यवस्थापनाला तसेच प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांना पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने गावात डिजे बंद करण्याचे आदेश द्यावेत. अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
श्री एकवीरा देवी संस्थानचा आदर्श व प्रेरणादायी निर्णय.
ध्वनी प्रदूषणामुळे होणारे आजार त्याचे धोके लक्षात घेवुन श्री एकवीरा देवी संस्थानने आपल्या उत्पन्नाचा विचार न करता सामाजिक जबाबदारी जपण्याच्या दृष्टीने मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यात डिजे बंदीचा घेतलेला निर्णय प्रेरणादायी व अभिनंदनीय असुन त्यांच्या निर्णयाचा आदर्श घेत जिल्ह्यातील ईतर मंगल कार्यालयांनी सुध्दा आपल्या मंगल कार्यालयात डिजे वाजविण्यावर बंदी करावी. असे सुज्ञ नागरिकाकडून बोलल्या जात आहे.
ध्वनी प्रदूषणामुळे सर्व जग त्रस्त असुन हि जागतिक समस्या बनली आहे.विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर डिजे ला प्राधान्य दिल्या जात असल्याने ध्वनिप्रदूषण वाढत आहे हे टाळण्यासाठी श्री एकवीरा देवी संस्थानच्या वतीने मंदिर परिसरातील संस्थानच्या मंगल कार्यालयात पार पडणाऱ्या विवाह सोहळ्यात डिजे वाजविण्यावर बंदी आणुन डिजे विरहित विवाह सोहळा पार पडला पाहिजे याकरिता विश्वस्त मंडळाने मासिक बैठकीत डिजे मुक्त मंगल कार्यालय करण्याचा निर्णय घेतला असुन यानंतर डिजे विरहित विवाह संपन्न करण्याच्या अटीवरच विवाह करण्यास परवानगी देण्याचा ठराव घेण्यात आला असुन त्या संदर्भात पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात येणार आहे तसेच नागरिकांनी सुद्धा आपल्याकडील विवाह सोहळ्यात डिजे न वाजविण्याची निर्णय घ्यावा.असे श्री साहेबराव पाटील कदम(कोषाध्यक्ष श्री एकवीरा देवी संस्थान तथा माजी जि. प. सदस्य यवतमाळ) यांनी म्हटले आहे

RELATED ARTICLES

Most Popular