HomeUncategorizedहिवरा संगम येथे महसूल अधिकारी यांनी रेती चोरट्यांवर कार्यवाही

हिवरा संगम येथे महसूल अधिकारी यांनी रेती चोरट्यांवर कार्यवाही

हिवरा संगम येथे महसूल अधिकारी यांनी रेती चोरट्यांवर कार्यवाही

( कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता )

हिवरा संगम प्रतिनिधी

महागाव तालुक्यातील हिवरा संगम हे मागील काही दिवसापासून रेती चोरट्यां मुळे हिवरा हे गाव अधिकच प्रसिद्धी मिळत आहे व नावारूपाला आले आहे असे समाजात बोलल्या जाते आहे रेती तस्कर सुद्धा आपल्या साम्राज्याचे पाय रोहत असल्याचे
समाजामध्ये बोलल्या जात असताना अशातच मंडळ अधिकारी यांनी रेती तस्करांवर सोमवारी तीन वाजताच्या दरम्यान हिवरा बस स्टॉप येथे रेती घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टर वर कार्यवाही केल्याचे कळत आहे बऱ्याच दिवसापासून रेती तस्करी हे सर्वच भागात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आपणास नेहमीच वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचण्यास किंवा पाहण्यास मिळते यामध्ये बरेच नागरिकांचे मत असे होते की रेती तस्करांच्या व महसूल अधिकारी वर्गांच्या संगनमतामुळे चालते की काय असा प्रश्न बऱ्याच नागरिकांच्या मनाला हेडसावत होता पण हिवरा येथे सोमवारला झालेल्या कार्यवाहीमध्ये हे निष्पन्न झाले की रेती तस्करांची महसूल अधिकारी वर्गांची स्पष्ट भूमिका निदर्शनास आली असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे मंडळ अधिकारी साहेब एकुलवार यांचे सर्वत्र या कार्यवाहीबद्दल अभिनंदन केले जात असून समाजामध्ये रेती तस्करांवर अशा कडक कार्यवाही करण्याची गरज असल्याची ही नागरिकांमधून चर्चेला उधाण आहे
हिवरा व धनोडा परिसरातील रेती तस्करांचा धुमाकूळ चालत असताना रेती तस्करांवर ही महत्त्वाची कार्यवाही मंडळ अधिकारी साहेब यांनी केली असून इतर रेति चोरट्यांचे धाबे या कार्यवाहीने दनानले आहेत
सदरचे ट्रॅक्टरचे हे हिवरा येथीलच असल्याचे बोलल्या जात असू दंडात्मक कार्यवाही करण्याकरिता सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालय महागाव येथे लावण्यात आले कार्यवाही दरम्यान मंडळ अधिकारी हिवरा एमआरगुलवार ग्राम महसूल अधिकारी पी जी मस्के नलावडे ग्राम महसूल सेवक जीवन जाधव अमोल जानकर हे हजर होते आशा कडक कार्यवाया होत असून सुद्धा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी व माती सह मुरूम हे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असून या सर्व लोकांवर अशाच प्रकारच्या अधिकारी वर्गाने कडक कार्यवाही करून चोरी जात असलेला महसूल हे शासनाच्या तिजोरीत पोहोचवावा अशी मागणी जनसामान्याकडून केली जात आहे

RELATED ARTICLES

Most Popular