
१० घरफोडी व ०१ चोरीचा गुन्हा असे एकूण ११ गुन्हे उघडीस आणून ३४५.०१ मि ग्राम सोन्याचे दागिने व २०० मि ग्राम चांदीच्या वस्तू केल्या हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई
पुसद तालुका प्रतिनिधी
मागील काही दिवसात यवतमाळ शहरात घरफोडीचे घटनामध्ये वाढ झाली होती त्यातच दिनांक ०६ / ०२ / २०२५ रोजी यवतमाळ येथील एस बी आय चौक परिसरात असलेल्या अपर्णा अपार्टमेंट मध्ये दिवसा ढवळ्या घरफोडी चा प्रकार झाला होता त्याच प्रमाणे पोलीस ठाणे वणी व शिरपूर येथे सुद्धा घरफोडीच्या घटना झाल्या होत्या तसेच दिनांक १८ / १ / २०२५ रोजी दिग्रस येथील रोडा ज्वेलर्स या सराफा दुकानातून अनोळखी महिलांनी हातचलाखीने सोन्याचा रानी हार चोरी केल्याची घटना झाली होती जिल्हात अशा चोरी व घरफोडीच्या घटनामध्ये वाढ होत असल्याने मा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना सदरचे गुन्हे तात्काळ उघडीस आणने करिता आदेशीत केले होते त्या अनुषंगाने पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अधिनस्त पथकांना गुन्हेगारांचा मागोवा घेवून गुन्हे उघडीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यावरून स्थागुशा कडील पथकांनी खालील गुन्हे उघडीस आणले आहे
१) दिनांक १३ / २ / २०२५ रोजी सपोनि संतोष मनवर व त्याचे पथकाने प्राप्त गोपनिय माहितीच्या आधारे संशईत आरोपी रोशन उर्फ चिकन्या मोतीराम क्षिरसागर रा चिमूर जि चंद्रपुर ह मु विश्वशांती नगर यवतमाळ यास आर्णी रोड एम एस ई बी कार्यालय परिसरातून ताब्यात घेवून आरोपीकडे कौशल्य पुर्वक तपास करून पो स्टे यवतमाळ शहर येथील ०३ पो स्टे अवधूतवाडी येथील ०२ पो स्टे लोहारा येथील ०२ असे एकूण ०७ गुन्हे उघडीस आणून ११५ . ९८० मि ग्राम सोन्याचे दागिने तत्कालीन किंमत २ ९९ ८५१ रुपयाचे हस्तगत केले असून आरोपीस पुढील तपास कामी पो ठाणे अवधूत वाडी यांचे ताब्यात दिले आहे
२) दिनांक १३ / २ / २५ रोजी सपोनि धनराज हाके व त्यांचे पथकाने प्राप्त गोपनिय माहितीचे आधारे संशईत आरोपी १) पंकज राजु गोंडाने वय २८ वर्ष रा चवरे नगर सुतगिरणी रोड अमरावती जि अमरावती व आरोपी क्रं २) सागर जनार्धन गोंगटे वय ३४ वर्ष रा गांधी चौक कारंजा जिल्हा वाशिम यांना अमरावती येथून ताब्यात घेवून आरोपी कडे केलेल्या तपासात त्याने पोस्टे वणी व शिरपूर येथील घरफोडीच्या गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांचेकडून ११९ . १२० मि ग्राम सोन्याच्या दागिने किंमत १० ३६ ooo रुपये व ०३ मोबाईल किंमत २१००० रुपये असा एकूण १० ५७ ३४४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून घरफोडीचे ०२ गुन्हे उघडीस आणून आरोपीस पुढील तपास कामी पो ठाणे वणी यांचे ताब्यात दिले आहे
३) दिनांक १३ / २ / २०२५ रोजा रोजी सपोनि गजानन गजभारे पोउनि शरद लोहकरे व त्यांचे पथकाने सी सी टी व्ही फुटेज गोपनिय माहिती व तांत्रिक विश्लेशाचे आधारे शंसईत महिला आरोपी १) सौ नंदा मच्छींद्र डूकले वय २२ वर्ष आरोपी २) रोहीत मच्छींद्र डूकले वय २२ वर्ष रा खबळवाडी पाचोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर यांना ता पैठण जि छत्रपती संभाजी नगर येथून ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता त्याचे साथीदार आरोपी क्रं ३) सौ शितल अजय पवार वय २७ वर्ष रा गेवराई जिल्हा बीड ४) एक विधी संघर्ष बालीका यांचे सह पोस्टे दिग्रस येथील रोडा ज्वेलर्स या सराफा दुकानातून सोन्याचा रानी हार चोरी केल्याची कबूली दिली असून आरोपी डूकले यांचेकडून ६० मि ग्राम तत्कालीन किंमत ४ ३० ००० रुपयाचा रानी हार हस्तगत करण्यात आला
४) दिनांक १३ / २ / २०२५ रोजी सपोनि गजानन राजमल्लु व त्यांचे पथकाने प्राप्त गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे संशईत आरोपी रशिद शहा उर्फ तलवार सिंग हमीद शहा वय ४९ वर्ष रा अकोला जिल्हा अकोला यास अकोला येथून ताब्यात घेवून आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने पोस्टे यवतमाळ शहर येथील अपर्णा अपार्टमेंट मधील फ्लॅट मध्ये दिवसा घरफोडी केल्याची कबूली दिल्याने त्याचे कडून ५० मि ग्राम सोन्याचे दागिने तत्कालीन किंमत ५० ००० रुपये व २०० मि ग्राम चांदीच्या वस्तुकिमंत १०००० रुपये असा एकूण ६० ००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपीस पुढील तपास कामी पो ठाणे यवतमाळ शहर यांचे ताब्यात दिले आहे
सदरची कारवाई ही मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप श्री सतीश चवरे पोनि स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात सपोनि संतोष मनवर सपोनि गजानन गजभारे पोउपनि धनराज हाके गजानन राजमल्लु शरद लोहकरे पोलीस अमलदार योगेश गटलेवार सैयद साजिद बंडू डांगे अजय डोळे प्रशांत हेडाउ रितुराज मेढवे निलेश राठोड विनोद राठोड आकाश सहारे रुपेश पाली योगेश डगवार आकाश सुर्यवंशी देवेद्र होले योगेश टेकाम सुनिल पंडागळे सुधीर पांडे सुधिर पिदुरकर उल्हास कुरकुटे निलेश निमकर सलमान शेख रजनिकांत मडावी नरेश राऊत सतिश फुके संतोष भोरगे तेजाब रणखांब रमेश राठोड सुभाष जाधव कुणाल मुंडोकार कविश पाळेकर डिंगांबर पिलावन सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे